About MSDA

A movement to provide equal opportunity for progress and promotion of medium-scale real estate developers of India. MSDA service as a platform for real estate developers to voice their concerns and bring about mutual growth. Furthermore, the association also looks to words achieving all-round progress through the employment opportunities and infrastructure development and consulting services.

मिडियम स्केल डेव्हलपर्स असोसीएशन “ दि. ०९/०७/२०१९ साली   पुणे  येथे स्थापना  झाली.
या संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.
संघटनेचेसंस्थापक आणि अध्यक्ष उद्योजक श्री. मिलिंद श्रीपती पाटील असून त्यांना लँड डेव्हलपर्स व बिल्डर व्यवसायाचा प्रदिर्घ अनुभव आहे. 

संघटना स्थापनेमागील  उद्दिष्ट्ये :-

 • सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात बांधकाम व्यवसायला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यस्थेवर होताना दिसत आहे .
 • बांधकाम व्यवसायची व्याप्ती आणि वृद्धी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये  मोलाची कामगिरी बजावत आहे.
 • विकासक हे बांधकाम व्यवसायातील महत्वाचे घटक आहेत.

  १) “Captain of the ship” या उक्त्ती प्रमाणे ‘विकासक’ आणि त्यांचा सदैव उत्कर्ष हा संघटनेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. देशाची आर्थिक स्थिति सुधारण्यासाठी आणि उध्योग व्यवसायांना चालना मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना व अर्थसाहाय्य पुरवण्यात येते . त्याचा लाभ आपल्या संघटनेद्वारे मिळवून दिला जाईल.
  २) ग्रामीण भागातील विकासाच्या उद्योगाची माहिती त्यांच्या जिल्ह्यातील श्हरांतील विकासक तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा संपूर्ण जबाबदारी “मिडियम स्केल डेव्हलपर्स असोसीएशन” ही संघटना स्वीकारत आहे.
  3) ग्रामीण भागांधील उद्योगास चालना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यवसायिकांना प्रकाशझोतात आणण्याचे काम केले जाईल.
  ४) विकासक कोणताही प्रकल्प राबवत असताना सर्व स्तरावरील समस्याचे निवारण संघटनेच्या माध्यमातून केले जाईल.
  ५) ही संघटना मध्यम स्वरुपाच्या ( एक एकर क्षेत्राच्या आतील ) विकासकासाठी कार्यरत राहील.

सभासदांना बांधकाम क्षेत्राशी निगडीत खात्यांची माहिती /परिपत्रके व शासन निर्णय  इ माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तसेच नवीन शासन निणर्यं झाल्यानंतर पुढील आठ दिवसांपर्यंत त्या विषयाची अधिकृत माहिती “मिडियमस्केलडेव्हलपर्सअसोसीएशन” च्या सॉफ्टवेअर वर उपलब्ध देण्यात येईल।