₹२.६७ लाखांची सबसिडी आणि मोफत आरोग्य सेवा!
जमीन अधिग्रहित होतेय? ‘भूसंपादन कायदा 2013’ नुसार तुमचे हक्क काय? MSDA चा सल्ला: भरपाई मिळेपर्यंत जमीन ताब्यात घेतली जाऊ शकत नाही!
PMRDA मधील डेव्हलपमेंट प्लॅन रखडला: 'पार्ट डीपी' मंजूर करण्याबाबत MSDA ची मागणी

-
रखडण्याचे कारण: चौकशी केल्यास, 'काही लोकांनी हरकत घेतल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' हे कारण पुढे केले जाते. त्यामुळे इतरांचा डीपी फायनल करता येत नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जाते.
-
वस्तुस्थिती: MSDA ने केलेल्या सखोल माहितीनुसार, गावातील केवळ १०% लोकांनीच अशा हरकती नोंदवलेल्या आहेत.
-
गंभीर परिणाम: मुठभर लोकांच्या कोर्ट कचेऱ्या वर्षानुवर्षे चालू राहणार आणि इतर ९०% शेतकऱ्यांना डीपी फायनल न झाल्यामुळे कोणताही मोबदला मिळत नाही आणि ते रस्त्यासारख्या साध्या सुविधेपासून वंचित राहतात. हा फार मोठा अन्याय आहे.
- 'पार्ट डीपी' ची मागणी: ज्यांच्या हरकती आहेत असे १०% लोक वगळून, इतर ९०% लोकांचा पार्ट डीपी (Partial DP) तात्काळ फायनल (मंजूर) करावा.
- फायदे
-
यामुळे रखडलेली विकास कामे अतिशय वेगाने मार्गी लागतील.
-
आर्थिक हलाखीतील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल.
-
PMRDA ची विकास कामे मार्गी लावण्याची क्षमता आणि विश्वासार्हता वाढेल.
- सध्याची अडचण: पाच गुंठ्याचा प्लॉट सँक्शन करायचा असला तरी शेतकऱ्यांना पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथील PMRDA च्या मुख्य कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. हे आर्थिकदृष्ट्या आणि वेळेच्या दृष्टीने परवडणारे नसते.
- MSDA ची मागणी:
-
सँक्शनिंग अथॉरिटीची ऑफिसेस ही प्रत्येक तालुका स्तरावर असायला हवीत.
-
यामुळे शेतकऱ्यांचा शहरात येऊन वेळ वाया घालवण्याची गरज पडणार नाही आणि कामे जलद गतीने होतील.


