Possession
Land Registration
सेल डीड: मालमत्ता खरेदीचा कायदेशीर पुरावा
सेल डीड हा जमीन, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करताना तयार होणारा कायदेशीर करार आहे, जो मालकी हक्क सिद्ध करतो. यात खरेदीदार-विक्रेत्याची माहिती, मालमत्तेचा तपशील, किंमत आणि ताबा यांचा उल्लेख असतो. नोंदणीकृत सेल डीडशिवाय कोणतीही मालमत्ता कायदेशीररित्या आपल्या नावावर होत नाही.

सेल डीड म्हणजे काय?
सेल डीड म्हणजे जमीन, फ्लॅट, दुकान किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना तयार केला जाणारा एक कायदेशीर कागद. आपण कुठलीही मालमत्ता खरेदी करत असताना, फक्त पैसे देऊन आणि तोंडी व्यवहार करून खरेदी पूर्ण होत नाही. ती मालमत्ता आपल्याच्या नावावर यावी यासाठी सेल डीड हा कागद बनवावा लागतो आणि तो नोंदणी कार्यालयात रजिस्टर करावा लागतो. हाच खरेदी-विक्रीचा अधिकृत पुरावा असतो.
सेल डीड मध्ये काय काय असते?
सेल डीड म्हणजे दोघांमधील (खरेदीदार आणि विक्रेता) एक कायदेशीर करार :
- खरेदीदार आणि विक्रेत्याचे संपूर्ण नाव, पत्ता आणि ओळखपत्र तपशील .
- जमीन किंवा फ्लॅटची माहिती गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्रफळ, गावाचे नाव, सीमारेषा वगैरे .
- मालमत्तेची एकूण किंमत आणि पैसे कसे व केव्हा दिले गेले याचा तपशील .
- मालकी हक्काबाबत हमी - विक्रेत्याजवळ मालकी आहे आणि पुढे कोणताही दावा येणार नाही अशी हमी .
- मालमत्ता कधी ताब्यात दिली जाणार आहे याची तारीख .
- कोणतेही कर्ज, तगादा, नोटीस किंवा कोर्ट केस वगैरे आहेत का याबाबत माहिती .
- साक्षीदारांची नावे व सह्या, जे व्यवहाराची साक्ष देतात.
- सर्व माहिती नोंदवल्यावर, हा कागद स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी कार्यालयात रजिस्टर करावा लागतो .
सेल डीड का महत्त्वाचा आहे ?
सेल डीड करताना काय काळजी घ्यावी?
- विक्रेत्याजवळ मालकी हक्क खरोखर आहे का हे 7/12, फेरफार उतारा, वारस प्रमाणपत्र बघून खात्री करा.
- मालमत्तेवर कोणतेही कर्ज किंवा खटला नाही ना ते बँकेचे प्रमाणपत्र किंवा कोर्ट कागदांमधून तपासा.
- सर्व माहिती व अटी स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत का ते वाचून बघा.
- स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन नक्की झाले आहे का ते पक्के करा.
- शंका असल्यास वकीलाचा सल्ला घ्या.
निष्कर्ष : सेल डीड हा कागद तुमच्या मालकीचा खरा पुरावा असतो. त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक मुद्दा समजून, वाचून आणि खात्री करून मगच सही करावी. मालमत्ता खरेदी म्हणजे एक मोठा आर्थिक निर्णय असतो, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहणे फार महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन, स्पष्ट व्यवहार, आणि शहानिशा हेच तुमच्या सुरक्षिततेचे तीन आधार आहेत.


