PMRDA, FSI चे आश्वासन पूर्ण करा! नकाशामध्ये बांधकाम क्षमता स्पष्ट करा.
15/11/2025कंत्राट रिंग मोडा: महापालिका कामांमध्ये गुणवंत आणि नवीन कंत्राटदारांना संधी
15/11/2025MSDA चा सखोल अभ्यास:
"राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद येथे फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम बसवण्यात यावी."
निधी वाटपातील विषमता
- उदाहरण: ₹ ३०० कोटी टॅक्स भरणाऱ्या वॉर्डातील चार रस्त्यांपैकी, सर्वात जास्त निधी राजकीय हस्तक्षेप असलेल्या रस्त्याला मिळतो.
- त्या खालोखाल शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेप असलेल्या रस्त्याला
- त्यानंतर मोठे फायनान्सर असलेल्या रस्त्याला.
- आणि सर्वात कमी निधी सर्वसामान्य माणसांसाठीच्या सुविधांच्या वाट्याला येतो.
- अन्याय: वास्तवात, हे सर्वसामान्य लोकच सर्वात जास्त टॅक्स देतात, पण त्यांना मिळणारा निधी अतिशय कमी असतो.
MSDA चे समाधान: निधीचे हे असमान वाटप थांबवण्यासाठी आणि निधी वाटपाला शिस्त लावण्यासाठी MSDA ची फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम अतिशय महत्त्वाचा वाटा उचलू शकते.
आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेचा निर्धार
तुम्ही या प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकतेच्या लढ्यात MSDA सोबत सहभागी होण्यास तयार आहात का?

निधीच्या गैरव्यवहारावर MSDA चा उपाय
AV Finance Controlling System:
भ्रष्टाचाराने जीवनाचे प्रत्येक अंग पोखरलेले आहे, अगदी राजकीय पक्षसुद्धा. लोकांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष किंवा त्यांच्या संघटनांत भ्रष्टाचार शिरला आहे तो भांडवलशाहीचा गुणधर्म म्हणून. याचा अर्थ लोकांचे पक्ष किंवा त्यांच्या संघटना नोकरशाही इतक्या बरबटलेल्या आहेत असे अजिबात नव्हे. नोकरशहा हा माणसांपासून तुटलेला आणि माणसांच्या उरावर येऊन बसलेला एक सर्वात भयंकर समाजकंटक आहे. हे बोलताना आमच्यासमोर आहे ती महानगरपालिका5.
महानगरपालिका निधी आणि MSDA चा अभ्यास
महापालिकेतील पैशाचा वापर ही चिंतेची बाब आहे. हा खर्च पूर्वनियोजित आहे, नवीन दिशा देणार आहे की भविष्याचे नियोजन म्हणून केलेला आहे हे सामान्य माणसाला कधीच समजत नाही.
-
MSDA तर्फे हे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक वार्डचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.
-
महापालिकेने तयार केलेल्या वॉर्डच्या नकाशांची माहिती घेतल्यास 50 टक्क्याहून अधिक कामे विस्कळीत असतात9.
-
MSDA तर्फे प्रत्येक वार्डमधील मूलभूत सुविधांची यादी तयार केली जाईल. त्यापैकी किती सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत त्यातून वगळण्यास अजून किती मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या राहिलेल्या आहेत हे आपल्याला समजेल. त्याच अनुषंगाने त्याचे बजेट देखील काढता येईल.
कर संकलन आणि निधीचे असमान वाटप
-
कोणत्याही वार्डमध्ये राहणारी लोकसंख्या ही कमर्शियल, इंडस्ट्रियल, रेसिडेन्शिअल आणि स्लम या चार प्रकारात विभागलेली असते.
-
हे चारही स्तर महानगरपालिकेला डेव्हलपमेंट चार्जेस आणि टॅक्सच्या रूपात निधी जमा करत असतात.
-
एखादा वॉर्ड दरवर्षी 300 कोटी रुपये जमा करत असेल याचाच अर्थ पाच वर्षाच्या मुदतीत तो 1500 कोटी रुपये जमा करतो.
-
सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते की जितका टॅक्स गोळा होतो त्याच्या निम्मी रक्कम तरी त्यावर खर्च करावी, जेणेकरून पुढील दहा वर्षाच्या कालावधीसाठीचा आराखडा तयार करता येईल.
-
परंतु असे होत नाही. टॅक्स स्वरूपातील निधीचे असमान वाटप हाच कळीचा मुद्दा आहे.
MSDA ची मागणी: Finance Controlling System
-
चुकीच्या पद्धतीने केले जाणारे खर्च थांबवणे गरजेचे आहे.
-
त्यासाठी MSDA तर्फे राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद येथे फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम बसवण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी असेल.
-
300 कोटी रुपये टॅक्स भरणाऱ्या एखाद्या वॉर्डात चार रस्ते असतील, तर सर्वात जास्त निधी हा राजकीय हस्तक्षेप असलेल्या रस्त्यावरील विकास कामांसाठी मिळतो. त्या खालोखाल शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेप असलेल्या रस्त्याला, त्यानंतर मोठे फायनान्सर असलेल्या रस्त्याला, आणि उरलेला थोडासा निधी म्हणजे हा सर्वसामान्य माणसांसाठीच्या सुविधांच्या वाट्याला येतो.
-
वास्तवात हे सर्वसामान्य लोकच सर्वात जास्त टॅक्स देत असतात आणि त्यांच्या वाट्याला निधी मात्र अतिशय कमी येतो.
-
निधीचे हे असमान वाटप थांबवण्यासाठी आणि निधी वाटपाला शिस्त लागण्यासाठी MSDA ची फायनान्स कंट्रोलिंग सिस्टीम अतिशय महत्त्वाचा वाटा उचलू शकते.
-
MSDA चे प्रमुख मिलिंद पाटील सर याबाबत सर्वात जास्त आग्रही आहेत.
-
आपले आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वायत्तता आपण स्वतः मिळवू शकतो. शासनाची आम्हाला गरज नाही. आमची गरज मात्र शासनाला पदोपदी लागेल हे नक्की. त्या प्रत्येक वेळी आम्ही आमच्या मागण्यांवर आग्रह धरणारच. आजवर झालेली ही सगळी घाण निपटून काढणारच.
निधीच्या गैरव्यवहारावर MSDA चा उपाय


