शरद पवार साहेबांचा आशीर्वाद, MSDA आता ‘प्रशासकीय क्रांती’ घडवणार!
27,000 एकर जमीन संपादित, पण 2016 पासून एकाही स्कीममध्ये काम नाही!
MSDA ने शासनाला दिलेली निवेदने: प्रशासकीय क्रांतीचा आग्रह
-
सध्याची समस्या: तलाठी, सर्कल, तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयात भेटत नाहीत. "मीटिंगला गेले आहेत," "व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आहेत," किंवा "स्थळ पाहणीसाठी गेले आहेत" अशी ठराविक उत्तरे वारंवार दिली जातात.
-
MSDA ची मागणी:
-
बायोमेट्रिक रेकग्निशन: तलाठी आणि सर्कल कार्यालयात थंब इम्प्रेशन रजिस्टर (बायोमेट्रिक) आणि हालचाल रजिस्टर असले पाहिजे.
-
हालचाल रजिस्टर: यामध्ये केलेल्या नोंदीमुळे तलाठी आणि तहसीलदार दिवसभरात नक्की काय काय करतात याचा लेखाजोखा घेता येईल.
-
पारदर्शकता: सदर हालचाल रजिस्टर हे कोणालाही पाहण्यासाठी उपलब्ध असावे.
-
अंमलबजावणी: हे दोन्ही रिपोर्ट अप्पर जिल्हाधिकारी रोज तपासून जिल्हाधिकारी साहेबांना कळवतील.
-
परिणाम: प्रशासकीय यंत्रणेवर असा जागता पहारा ठेवल्याने लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतील.
-
-
ऑनलाइन कागदपत्रे: शेतकऱ्यांना १९३० पासूनचे जुने फेरफार व जुने ७/१२ वेळेत ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत कायद्यात योग्य ती दुरुस्ती करावी.
-
वेबसाईट सुधारणा: महाभूमिअभिलेख ही वेबसाईट बऱ्याच वेळेस काम करत नाही; ती तातडीने अद्ययावत करून त्यात सुधारणा करावी.
-
मोजणीतील त्रास कमी करा: जागेची मोजणी करताना इतर कागदपत्रांची वारंवार मागणी केली जाते, ज्यामुळे शेतकरी वर्गाला त्रास होतो. ही अनावश्यक मागणी बंद झाली पाहिजे.
-
तुकडेबंदी: MSDA तर्फे शासनाला तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करावी असे निवेदन दिले गेले आहे.
-
MSDA ची मागणी (३ विभागांची संकल्पना): प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांच्या पदांची विभागणी ३ विभागांमध्ये (अ, ब, क) झाली पाहिजे.
-
विभाग 'अ': आरडीसी (RDC) आणि प्रांताधिकारी या एक्झिक्युटिव्ह (Executive) पोस्टिंगसाठी असावा.
-
विभाग 'ब' व 'क': हे जात पडताळणी आणि इतर नॉन-एक्झिक्युटिव्ह (Non-Executive) पोस्टिंगसाठी असावेत.
-
-
पदांतर (Rotation): कोणताही अधिकारी एखाद्या डिव्हिजनमध्ये नऊ वर्षे काढत असेल, तर त्यांनी त्या नऊ वर्षात 'अ', 'ब', 'क' अशा तिन्ही विभागांमध्ये काम केल्यास, प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याला सर्व क्षेत्रातील अनुभव आणि काम करण्याची संधी मिळेल.
-
MSDA ची मागणी: मंत्रालयातील प्रधान सचिवांनी खास मंत्रालयातील एन्ट्रीसाठी एक मोबाईल ॲप बनवून घ्यावे.
-
ॲप प्रक्रिया:
-
ॲप ओपन केल्यावर, संबंधित व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यांना कुठल्या विभागात जायचे आहे याची माहिती सबमिट करावी.
-
त्यानंतर संबंधित व्यक्तीला एक क्यू आर कोड (QR Code) मिळेल.
-
-
सुविधा: या क्यू आर कोडमुळे दुसऱ्या दिवशी तो मंत्रालयाच्या गेटवर जाऊन स्कॅन करून सहजरीत्या आत जाऊ शकेल.
MSDA करत असलेले हे कार्य म्हणजे एक प्रचंड मोठी प्रशासकीय क्रांती आहे. कष्टकऱ्यांवरील आणि सामान्य जनतेवरील होणारा अन्याय संपुष्टात आणायचा असेल, तर MSDA ची प्रशासकीय क्रांती हे एका ठिणगीचे काम करेल
प्रशासकीय क्रांतीसाठी MSDA चा ‘जागता पहारा’: तलाठी ते मंत्रालय, कार्यपद्धतीत मोठे बदल करण्याची निवेदने


